36.8 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeलातूरडॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारात विविध साहित्य दाखल

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारात विविध साहित्य दाखल

लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३४ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे गतवर्षाप्रमाणे विविध साहित्याचे स्टॉल अभारण्यात आले आहे. या स्टॉलवरून अनुयायी मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह म्हणजे एक आनंदाचा पर्वच असतो. त्यानिमित्ताने शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्मान झाले आहे. १४ एप्रिल रोजी शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गतवर्षाप्रमाणे यंदाही शहरात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची जोरदार तयारी सूरु आहे. जयंतीनिमित्त शहरात विक्री आलेल्या निळ्या झेंड्यांच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे माहीती महिला व्यापारी ग्रीश्मा गायकवाड यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कसमोर गेल्या आठवड्यापासून जवळपास आठ ते नऊ स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्या स्टॉलवर भीम अनुयायांसाठी निळे झेंडे व इतर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहेत. गतवर्षाच्या तूलनेत यंदा झेंड्यांच्या किंमतीत अल्पक्ष वाढ झाली असून हे झेंडे पुणे, सोलापूर, मुंबई या ठिकाणाहून शहरातील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये गाडीचे मोठे झेंडे १०० ते २५० रुपयांपर्यंत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले झेंडे १५० ते ८०० रुपयापर्यंत तसेच टूव्हिलरचे छोटे झेंडे ३० रुपये, गमजे ३० ते ५० रुपये, बिल्ले २० ते ३० रूपये या दराने विकले जात असल्याचे स्टॉलवरील विक्रेत्यानी सागीतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR