37.4 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeलातूरडॉ. आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी

डॉ. आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी

लातूर : प्रतिनिधी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती लातूर शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी डॉ. आंबेडकर पार्कवर जनसागर लोटला होतो. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित  देशमुख, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी  अभिवादन केले. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकांनी जयंतीचा उत्साहात  आणखी भर पडली. विविध प्रभागांतून निघालेल्या मिरवणुकांचे मिरवणुक मार्गावर स्वागत करण्यात आले. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शहरात दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंते पय्यानंद थेरो, भंते बुद्धशील, भंते बोधिराज, माजी आमदार त्र्यंबक भिसे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे लातूरचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे यांच्यासह अन्य मान्यवरांनी लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जाऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, टवेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन  विजय देशमुख, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, कैलास कांबळे, चंद्रकांत चिकटे, आतिश चिकटे, पृथ्वीराज शिरसाट, विवेक सिरसाट, राजू गवळी, मोहन सुरवसे, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे,  राजा माने, राज क्षीरसागर, सचिन बंडापल्ले, अनंतराव देशमुख, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण कांबळे, आशाताई चिकटे, शारदा हजारे, नागसेन कामेगावकर, सहदेव मस्के, राजकुमार पाटील, रविशंकर जाधव, हरीराम कुलकर्णी, यशवंतराव पाटील, आयुब मणियार, धनंजय शेळके, यशपाल कांबळे, बाबा पठाण, व्यंकटेश पुरी, चंद्रकांत धायगुडे, प्रवीण सूर्यवंशी, अक्षय मुरळे, शरद देशमुख, सुमित खंडागळे, विजयकुमार सोबदे, राम स्वामी, हरिभाऊ गायकवाड, अनिलकुमार माळी, एकनाथ पाटील, बिभीषण सांगवीकर, तबरेज तांबोळी, गोरोबा लोखंडे, रविशंकर जाधव, पंडित कावळे, राजकुमार पाटील, विष्णुदास धायगुडे, अ‍ॅड. अंगद गायकवाड, अभिजीत इगे, पवनकुमार गायकवाड, आदीसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूरचे विविध पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR