19.1 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeलातूरडॉ. आंबेडकर यांच्या ७० फुटांच्या पुतळ्यासाठी निधी द्यावा

डॉ. आंबेडकर यांच्या ७० फुटांच्या पुतळ्यासाठी निधी द्यावा

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे स्टॅच्यू ऑफ नॉलेज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० फुट उंचीच्या पुतळा उभारणी तसेच शिवछत्रपती वाचनालय इमारतीची पुर्नबांधणी, हुतात्मा स्मारक व मराठावाडा मुक्ती स्मारकांचा पुर्नविकास, आदरणीय विलासराव देशमुख मार्गाचा दुसरा टप्पा  यासह विविध प्रकल्पासाठी त्वरीत निधी उपलब्ध करुन दयावा, त्याच बरोबर, कृषी महाविद्यालयाच्या जागेवर लातूर जिल्हा रुग्णालय व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविदयालयाच्या वतीने पटेल चौक येथे उभारावयाच्या मदर अ‍ॅण्ड चाइल्ड रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न त्वरीत सोडवावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २० डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
नागपूर येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शुक्रवारी नगर विकास व सार्वजनीक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेत सहभागी होताना लातूर शहरासह व राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पा बाबत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी आपली भुमिका मांडून मागणी नोंदवली. लातूर शहरात उभारण्यात येणा-या स्टॅच्यू ऑफ नॉलेज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० फुट उंचीच्या पुतळा उभारणीसाठी व परिसर विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाच्या वतीने लातूर शहरातील पटेल चौक येथे उभारावयाच्या मदर अँण्ड चाइल्ड रुग्णालयासाठी नगर विकास विभागाची जागा प्रति एक रुपया चौरस मीटर एवढ्या नाममात्र भाड्याने उपलब्ध करुन द्यावी. लातूर शहरातील मुख्य रस्त्याला समांतर पद्धतीने बांधण्यात येत असलेल्या विलासराव देशमुख मार्गाच्या दुस-या टप्प्यातील कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. लातूर शहरात उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृह बांधकामासाठीचा उर्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा. लातूर शहरात मनपाच्या वतीने एका शादीखानाचे बांधकाम पूर्ण केले आहे.  दुस-या शादीखानाचे बांधकाम  अपूर्ण अवस्थेत आहे, त्या शादीखाना इमारतीसाठी आवश्यक असणारा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा.
लातूर शहरात मनपाच्या वतीने मागच्या अनेक वर्षापासून शिवछत्रपती ग्रंथालय चालवण्यात येत आहे. आता या ग्रंथालयाची इमारत जुनी झाली असून त्या इमारतीची अदययावत पद्धतीने उभारणी आवश्यक झाली आहे, त्यामुळे शासनाच्या वतीने राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे, त्यासाठीही लातूर येथे निधी उपलब्ध करून देण्यात यावा, लातूर शहरातील वाहतुकीची कोडी सोडविण्यासाठी सिंग्नल व सीसीटीव्ही व्यवस्थेचे बळकटीकरण करावे, बहूमजली वाहनतळ उभारणीसाठी निधी उभारणी करुन दयावा, शहरातील दिवबत्ती व्यवस्था केद्रीय कंपनीकडे देण्यात आली आहे या कंपनीच्या कामकाजात सुधारणा करण्यात यावी.
अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी केंद्र व राज्यशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या एमएसडीपी योजना प्रभावीपणे राबवावी, मृत्यू पावलेल्या नागरीकांची अत्यवीधी करण्यासाठी स्मशानभुमी आणि दफनभुमी संदर्भात अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत त्यासाठी राज्यव्यापी धोरण राबवावे. खासगी रुग्णालयाची दर तीन वर्षांनी नोंदणी करावी, असा नियम आहे. बॉम्बे नर्सीग अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करुन नोंदणीसाठीची अट पाच वर्षापर्यंत वाढवावी आदी मागण्याही यावेळी आमदार देशमुख यांनी केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR