24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरडॉ. काळगे यांच्या विजयाचा जिल्हाभरात जल्लोष

डॉ. काळगे यांच्या विजयाचा जिल्हाभरात जल्लोष

लातूर : एकमत टीम
लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीरव काळगे यांच्या विजयाचा जल्लोष जिल्हाभरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. विविध तालुक्यातील आघाडीच्या पदाधिका-यांनी फटाक्यांची अतिषबाजी करीत व गुलालाची उधडण करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. उदगीर, अहमदपूर, चाकूर येथे आघाडीतील पदाधिका-यांनी एकमेकाना गुलाल लावून घोषणाबाजी करण्यात आली.
शिरुर ताजबंद येथे मंदिरात आरती, मिरवणूक
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे हे ७६००० हजार मतांनी विजयी झाल्याची माहिती मिळताच शिरूर ताजबंद येथील नागरिकांनी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांची शिरूर ताजबंद येथे मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. श्री महेश मंदीरामध्ये आरती करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुलाल व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
या प्रसंगी चेअरमन तुळशीराम भोसले,सुरेंद्र पाटील, राजू खंदाडे,प्रकाश वलसे, शिवानंद भोसले, गिरीश देशमुख, हरिभाऊ येरमे, रामभाऊ बेल्हाळे, निळकंठ पाटील, अमीर सौदागर,मोहन पाटील,रणधीर पाटील, संजय वाघमारे, एन.टी.बिराजदार, विनायक पाटील, बालाजी पाटील, मोहन पाटील, मुन्ना शेख, दिलीप मोरे,तूकाराम गोरे, भगवान मोरे, लक्ष््मण गवळी, फिरोज शेख, अब्बास तांबोळी, सद्दाम शेख, समीर शेख, राहुल भालेराव, जयवंत सगर, गणेश माने, राहुल वाघमारे, भगवान मोरे, बाळासाहेब डोंगरे विक्रम भोसले यांची उपस्थिती होती.  शिरूर ताजबंद येथील नागरिकांनी माजी मंत्री विनायकराव पाटील यांना पेढे देऊन पुष्पहार घालून सन्मान केला.  यावेळी फटाके, गुलाल उधळून आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
अहमदपुरात ढोला-ताशांचा निनाद
अहमदपूर येथे डॉ.शिवाजी काळगे यांच्या विजयाबद्दल फटाके फोडून, गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. येथील बसस्थानकासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलालाची उधळण करीत, ढोल- ताशाच्या निनादात विविध घोषणांनी विजयी जल्लोष साजरा केला.
    यावेळी रासपचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) बालाजी रेड्डी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. गणेशराव कदम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष राम बेल्लाळे, सय्यद साजिद, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, देवानंद मुळे, भारत रेड्डी, सोमेश्वर कदम, आर.डी.शेळके, सुधीर गोरटे, हरिभाऊ येरमे, निळकंठ पाटील, श्रीकांत बनसोडे, जराखॉन पठाण, राहूल शिवपुजे, देविदास सुरनर, राजू खंदाडे, किशोर कोरे, सरस्वतीबाई कांबळे, शहराध्यक्ष विकास महाजन, राजीव पाटील, भारत सांगवीकर, मुकेश पाटील, रमाकांत शेकडे, शिवकुमार बेद्रे, सुभाष गुंडीले, पद्माकर पेंढारकर, विलास पवार  हंगरगेकर, माधव कासले, अजय सुरनर आदींची उपस्थिती होती.
उदगिरात ताशांचा गजरात ठेका 
लातूर लोकसभामतदार संघातून काँग्रसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे विजयी झाल्याचे घोषीत झाल्यानंतर उदगीरात शहरात जल्लोषात फटाके फोड़त, गुलाल उधळत, ढोल ताशांच्या तालावर नाचत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) उध्दव ठाकरे शिवसेना नेते पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा केला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कांग्रेस, राष्ट्रवादी कोंग्रेस शरद पवार गट, उद्धव ठाकरे शिवसेना गट, नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या वेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, उपसभापती प्रिती भोसले, पद्माकर उगीले, , शीलाताई पाटील, अमोल कांडगिरे, राष्ट्रवादीचे चंदन पाटील नागराळकर, गजानन सताळकर, शिवाजी मुळे, ज्ञानेश्वर पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत टेंगेटोल, श्रीमंत सोनाळे  यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR