18.8 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeलातूरडॉ. प्रमोद घुगेला उत्तराखंडातून उचलले 

डॉ. प्रमोद घुगेला उत्तराखंडातून उचलले 

लातूर : प्रतिनिधी
बारा-तेरा दिवसांपूर्वी आयकॉन या हॉस्पीटलमध्ये आपल्याच कर्मचा-याचा खून करून फरार असलेल्या डॉ. प्रमोद घुगे यास लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिस पथकाने उत्तराखंड पोलिसांच्या मदतीने हरिद्वार येथून ताब्यात घेतले असून तेथील न्यायालयीन प्रक्रियेनंतर डॉ. घुगेला लातूरात आणले जाणार आहे. डॉ. घुगे हा लातूरमध्ये येताच पुढील कारवाई केली जाणार आहे.
आयकॉन हॉस्पीटल हॉस्पीटलचे सर्वेसर्वा डॉ. प्रमोद घुगे यांनी ११ डिसेंबर रोजी आपल्या हॉस्पीटलमध्ये सेक्युरिटी सुपरवायझर असलेला बाळू डोंगरे यास भाच्चा अनिकेत मुंडे यास सोबत घेवून जबर मारहाण केली होती. त्या मारहाणीतच डोंगरेचा मृत्यू झाला. बाळूचा अपघात झाला, जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार करीत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. घुगे यांनी ‘बाळू’ च्या नातेवाईकाला सांगितले. या घटनेनंतर आक्रमक झालेले नातेवाईक आणि शवविच्छेदन अहवालानंतर डॉ. प्रमोद घुगे त्यांचा भाच्चा अनिकेत मुंडे यांनी जबर मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे शिवाजीनगरचे अनेक पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले होते.
सदरचे पथक गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध होते. दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्ह्यातील फरार आरोपी नामे डॉ. प्रमोद घुगे याला सोमवारी सकाळी उत्तराखंड राज्यातून  लातूर पोलिसांनी उत्तराखंड पोलिसांच्या मदतीने एका आश्रमातून ताब्यात घेतल्याचे समजते. आपल्याच रूग्णालयातील कर्मचा-यांचा डॉ. घुगे यांनी अत्यंत निर्घूणपणे मारहाण करून खून करून तो थेट हरिद्वार येथील एका आश्रमात दडून बसला होता. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याने लातूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बाळू डोंगरे खून प्रकरणात डॉ. प्रमोद घुगे हा प्रमुख आरोपी आहे. दूसरा आरोपी डॉ. घुगे यांचा भाच्चा अनिकेत मुंडे अद्याप ही  फरार असून तो लवकरच पोलिसांच्या हाती लागेल असे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR