21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeलातूरडॉ. रमेश भराटे यांना वैद्यकिय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील प्रोफेसरशीप जाहीर

डॉ. रमेश भराटे यांना वैद्यकिय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील प्रोफेसरशीप जाहीर

लातूर : प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध श्वसनविकार व -हदयरोग तज्ज्ञ तथा गायत्री हॉस्पीटल लातुरचे संचालक डॉ. रमेश भराटे यांना ईंडियन मेडिकल असोशियशन (आय. एम. ए. )दिल्ली यांच्याकडुन मानद प्रोफेसर म्हणुन गौरविण्यात येणार आहे.
हैदराबाद येथे दि. २६ ते २८ डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असुन या परिषदेमध्ये देशातील नामवंत डॉक्टरांची ऊपस्थिती राहणार आहे. या परिषदेमध्ये देशातील वैद्यकिय क्षेत्रात ऊल्लेखनिय कार्य करणा-या चार डॉक्टरांना मानद प्रोफेसर म्हणुन गौरविण्यात येणार असुन यांत डॉ. रमेश भराटे यांचा समावेश आहे.डॉ. भराटे यांनी वैद्यकिय क्षेत्रातील आय. एम. ए., ईंडियन चेस्ट सोसायटी, नॅशनल कॉलेज ऑफ चेस्ट फिजीशियन ईत्यादी संस्थेवर ऊल्लेखनिय कार्य केलेले आहे.
 नुकतेच त्यांना फेलोशिप पण बहाल करण्यात आलेली आहे. त्यांना युरोपियन रेस्पीरेटरी सोसायटी, अमेरिकन कॉलेज ऑफ चेस्ट फिजीशियन, ए. टी. एस. ईत्यादी संस्थांनी मेंबरशिप बहाल केलेली आहे.विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे.महाराष्ट्र शासनाने पण त्यांचा गौरव केलेला आहे. त्यांनी रुग्ण सेवेबरोबर विविध सामाजिक ऊपकृम राबविले आहेत. लातुर, बीड, धाराशीव, बीदर, गुलबर्गा, परभणी ईत्यादी जिल्ह्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्या या ऊल्लेखनिय कार्याबद्दल वैद्यकिय क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR