धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजा-यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वच्या सर्व १३ पुजा-यांची नावे देखील समोर आली आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपी आहेत. यामधील २१ आरोपी फरार आहेत.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून आरोपी पुजा-यांची यादी मागवली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजा-यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नाही. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदेंनी ही माहिती दिली. तुळजापूर हे पुजा-यांचं गाव आहे. इथे अनेक पुजारी आहेत. सरसकट पुजा-यांना बदनाम करू नका, असे देखील विपीन शिंदे यांनी सांगितले.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजा-यांची नावे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील १३ पुजारी सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजा-यांची यादी मागवली आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजा-यांची नावे आल्याने सरसकट पुजा-यांची सुरू असलेली बदनामी थांबवा. तुळजापूर पुजा-यांचं गाव आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजा-यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचे पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी सांगितले. दरम्यान ३ वर्षांपासून तुळजापूर येथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीविरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी केला आहे.