चेन्नई : वृत्तसंस्था
तामिळनाडूच्या दोन सरकारी शाळांमध्ये अध्यात्मिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ही बाब ५ सप्टेंबरची (शिक्षक दिन) आहे. चेन्नईतील सैदापेट हायस्कूल आणि अशोक नगर गर्ल्स हायस्कूल या दोन शाळांमध्ये आध्यात्मिक प्रबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला. या प्रबोधन वर्गाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि या वर्गाची माहिती सरकारपर्यंत पोहोचली.
चौकशी समिती स्थापन : तामिळनाडूतील सरकारी शाळेतून हा व्हिडिओ समोर येताच विरोध सुरू झाला. (शुक्रवारी) शिक्षणमंत्री अनबिल महेश शाळेत पोहोचले. ते म्हणाले, या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली याची चौकशी केली जाईल. समिती स्थापन करण्यात आली आहे. अहवालाच्या आधारे दोन दिवसांत कारवाई केली जाईल.
स्टॅलिन यांचीही टीका : मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही अध्यात्मिक वर्गावर टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आमच्या शालेय पद्धतीच्या पुस्तकांमध्ये वैज्ञानिक विषय आहेत. विद्यार्थ्यांनी हे फक्त वाचावे आणि जाणून घ्यावे. नवीन कल्पना घेऊन शिक्षकही विद्यार्थ्यांच्या प्रगतीत हातभार लावू शकतात. राज्यातील सर्व शाळांमध्ये होणा-या कार्यक्रमांसाठी मी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आमच्या शाळेतील मुले हे तामिळनाडूचे भविष्य आहेत.