27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरतिरूका येथील दोन तरुण अपघातात ठार

तिरूका येथील दोन तरुण अपघातात ठार

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील तिरुका येथील दोन जीवलग मित्र दुचाकीवरून सोमवारी सकाळी कंधार तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कड्याच्या महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून गावाकडे परत येत असताना जळकोट ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर  गाढवेवाडी जवळ  कारने दुचाकीस्वाराना जोरदार धडक दिली यामध्ये दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.
जळकोट तालुक्यातील योगेश यशवंत जाधव (वय २०) व प्रेम मसुरे (वय  २३) हे जीवलग मित्र त्यांच्या दुचाकीवरून श्रावण सोमवार असल्यामुळे दि २६ ऑगस्ट रोजी  सकाळी दहा वाजता घागरदरा येथील कड्याच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघाले.  दोघांनी कड्याच्या महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि परत निघाले. परत येत असताना  दुपारी २ च्या दरम्यान  गाढवेवाडी जवळ समोरून येणा-या भरधाव कारने दुचाकीस जोरदार धडक  दिली.
यावेळी ते दूर रोडवरुन पडले आणि दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. या दोन तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकीचा चक्काचूर झाला.  योगेश आणि
प्रेम हे दोघेही अतिशय जीवलग  मित्र होते. दोघांच्या मृत्यूची बातमी तिरुका गावात पोहोचतात  संपूर्ण तिरुका गावावर शोककळा पसरली.  प्रेम दत्ता मसुरे वय २१ रा हाळी  (ता उदगीर) येथील रहिवासी असून तो आजोळी म्हणजेच तिरुका येथेच राहत होता\ त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. प्रेम दत्ता मसुरे यांचे तिरुका हे आजोळ आहे तर योगेश यशवंत जाधव वय २०  यांच्या  पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR