27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरतेरणा काठी घुमतोय लोकनेते विलासराव देशमुख यांचा आवाज 

तेरणा काठी घुमतोय लोकनेते विलासराव देशमुख यांचा आवाज 

निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यातील औराद शहाजानी येथील व्यापारी नंदू विश्वनाथराव भंडारे यांनी गौरी पूजन दिवशी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून गौरी पूजनचा सण साजरा केला. यामुळे आजही औरादच्या तेरणा तीरी लोकनेते विलासराव देशमुख यांचा आवाज घुमत आहे.
        निलंगा तालुक्यातील औराद शाहजानी येथील व्यापारी नंदू विश्वनाथराव भंडारे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गौरी पूजन दिवशी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करून गौरी पूजन सण साजरा केल्याने आजही लोकनेते विलासराव देशमुख यांचा आवाज घुमत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
नंदू भंडारे हा व्यापारी वर्षातून दोन वेळा म्हणजे लक्ष्मी पूजन व गौरी पूजन दिवशी लोकनेते विलासराव देशमुख यांना देवासमान मानत. त्यांच्या प्रतिमेचे प्रतिवर्षी पूजन करीत असल्याने औरादच्या तेरणा काठी आजही त्यांच्या अठवणीला उजाळा मिळत आहे.  यावेळी भारतबाई विश्वनाथराव भंडारे, जानकी भंडारे, यशोदा भंडारे, नारायण भंडारे, हरी भंडारे, उद्धव भंडारे, श्रद्धा भंडारे, ओम भंडारे, वैभव भंडारे, पंढरी भंडारे,  प्रताप भंडारे, राजू भंडारे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR