लातूर : प्रतिनिधी
माता रमाबाई आंबेडकर रुग्णालयात महिला प्रसूती गृह विभाग, लेबर कॉलनी, लातूर परिसरात लहान बालकांना प्रभूराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने ४० बालकांना ऊबदार चादर (बेबी शाल) वाटप तसेच अनेक वर्षांपासून हिवाळ्यात कष्टकरी परिवारांच्या बालकांना ऊबदार चादर (बेबी शाल) वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला.
सध्या कडाक्याची थंडी वाजत असल्याने प्रत्येक जण थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे परिधान करतात. लातूर शहरात मोठ्या रुग्णालयात उपाचार करण्यासाठी मध्यमवर्गीय परिवाराला परवडत नसल्याने कष्टकरी जनता व महिला उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल होऊन बाळाला जन्म देतात. थंडीच्या वातावरणात लहान बालकांना थंडी वाजू नये आणि त्यांची प्रकृती चांगली असावी म्हणून थंडीपासून बचाव करण्यासाठी त्या बालकांना ऊबदार चादर (बेबी शाल) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. थंडीपासून बचाव व थंडीचा सामना करण्यासाठी प्रभूराज प्रतिष्ठानने पुढाकार घेत लहान बालकांना ऊबदार चादर (बेबी शाल) त्यांच्या अंगावर मायेची ऊब चादर पांघरून सामाजिक उपक्रम रबविण्यात आला.
या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, प्रभूराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. अजय कलशेट्टी, वैद्यकीय स्त्री रुग्णालयचे अधीक्षक डॉ. रवींद्र भालेराव, वैद्यकीय अधिकारी मनपा डॉ. रमेश बगडे, अॅड. सुरेश सलगरे, अॅड. किरण चिंते, अॅड. गुरूप्रसाद येरटे, अॅड. कल्पना भुरे, अॅड. राधा वाघमारे, अॅड. माया साळुंके, अॅड. हर्षदा भटकुळे, अॅड. मोईज शेख, हेमंत वडणे, अशोक पंचाक्षरी, प्रकाश धादगिने, मोतीराम कदम, शिरीष माळी, डॉ. सोनाली केंद्रे, डॉ. क्रांती कापसे, मॅटरनल पल्लवी चव्हाण, एम. यू. क्षीरसागर, सचिन गोलावार, गोपाळ खंडागळ, अकबर शेख, तांबोळी, माळी, रुग्णालयाचे कर्मचारी आदी उपस्थित
होते.