पुणे : प्रतिनिधी
दत्ता गाडेचे वकील साहिल डोंगरे बारमध्ये दारू पीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बारमधून निघाल्यानंतर डोंगरेचा अपघात झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. त्यामुळे दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण झाल्याच्या अफवेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करण्यात आलेले नसल्याची बातमी समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत दत्ताच्या वकिलाचा अपघात झाला होता. दत्ता गाडेचे वकील साहिल डोंगरे बारमध्ये दारू पीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बारमधून निघाल्यानंतर डोंगरेचा अपघात झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. त्यामुळे दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण झाल्याच्या अफवेला पूर्णविराम मिळाला आहे.
काल (१८ मार्च), पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचे वकील साहिल डोंगरे यांचे अपहरण झाल्याची बातमी पसरली होती. साहिल डोंगरे यांचे अपहरण करून त्यांना २० ते २२ लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिले, असा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी तपास केला असता साहिल डोंगरे हे सागर बार येथे रात्री १० वाजता त्यांचे मित्र अनिकेत मस्केसोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसत असल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे हे रात्री ११.३० वाजता आणि पहाटे ५ वाजता दिवे घाट येथे असल्याचे दिसून आले.