23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeलातूरदररोज ३० टन टरबुजांची आवक; ग्राहकांकडून मोठी मागणी

दररोज ३० टन टरबुजांची आवक; ग्राहकांकडून मोठी मागणी

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काहि दिवसापासून शहरासह जिल्ह्यात दिवसभर ऊन आणि रात्री, पहाटे काहीशी थंडी असे सध्याचे विचित्र वातावरण पाहावयास मिळत आहे. या वातावरणाला उन्हाळा म्हणावा की हिवाळा, असा प्रश्नही पडू लागला आहे. असे असले तरी बाजारात रसाळ फळांची आवक वाढू लागली आहे. विशेषत: शहरातील बाजारपेठेत दररोज २५ ते ३० टन टरबूजची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. साधारण उन्हाळा सुरू झाला की टरबूजची आवक सुरू होते. मात्र यंदा मार्चच्या सुरुवातीस बाजारात मोठ्या प्रमाणावर टरबूजची आवक होण्यास सुरुवात झाली आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारात रसाळ फळांची मागणीही वाढू लागली आहे. बाजारात टरबूज, संत्री, कलिंगड, अननस, मोसंबी आदी फळांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसत आहे. त्याबरोबर फु्रट मार्केटमध्ये दररोज २५ ते ३० टन टरबूजची आवक होत असल्याचे व्यापा-यांनी सागीतले. त्याचबरोबर किरकोळ बाजारात देखील टरबूजची विक्री होऊ लागली आहे. साधारण ३० ते ५० रुपयांपर्यंत टरबूजला दर मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. उन्हाळयाला प्रारंभ झाल्याने फळांची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: कलिंगड, संत्री, अननस, मोसंबी आदी फळांना पसंती दिली जात आहे. त्याबरोबर शहरातील विविध भागात टरबूजची विक्री सुरू झाली आहे.
शहरातील चौकाचौकात देखील विक्री होऊ लागली आहे. उन्हाळा जसजसा वाढेल तसतशी मागणी देखील वाढणार असल्याचे व्यापारी सलिम शेख यांनी सागीतले. शहरातील बाजारापेठेत होणारी आवकही काहि प्रमाणात ग्रामीण भागातून तर काहि प्रमाणात शेजारी जिल्ह्यातून होत आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात टरबूजची विक्री चालू आहे. लातूर बाजारपेठेत टरगूजला चागल्या प्रतिचा दर मिळत असून शेतकरी वर्ग आनंदी आहे. बाजारात येणा-या टरगूजची झानणी करून त्या-त्या मालाला योग्य भाव मिळत आहे. सध्या बाजारात प्रतिदिवस २५ ते ३० टन टरगूजची आवक होत आहे. ही आवक कालानंतराने आढ होत आहे. एप्रिल-मे मिहन्यात मोठ्या प्रमाणात ही आवक आढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात उच्च प्रतिच्या टरबूजची आवक होत असून त्याला चागल्या भाव मिळत असल्याचे व्यापा-यांनी सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR