24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रदरेकर हे तमाशातील नथ नसलेली मावशी

दरेकर हे तमाशातील नथ नसलेली मावशी

जालना : प्रतिनिधी
प्रवीण दरेकर हे तमाशातील नथ नसलेली मावशी आहेत. त्यांना फक्त मला बदनाम करायचे आहे. दरेकर यांनी काय करायचे, ते करावे. मी मरायला तयार आहे. दरेकरांच्या डोक्यात फक्त देवेंद्र फडणवीस आणि सत्तेचे भूत घुसले आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे.

मराठे काहीही करू शकतात. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार पाडून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आणतील, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला आहे. ते अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठ्यांच्या मुलांना वेदना झाल्याने मी बोललो. मी दरेकर यांचे नाव घेतले नाही. मी तुमच्यावर थुंकतही नाही. मराठा समाजातील एका मुलीच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा दरेकरांनी अपमान केला आहे. म्हणजे समस्त महाराष्ट्रातील मराठ्यांच्या मुलांचा दरेकरांनी अपमान केला.

मराठा क्रांती आणि मराठा ठोक मोर्चा दरेकरांनी संपवला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांसाठी काय काय करता? तुमच्यामुळे बीडचा एक आमदार बँकेच्या घोटाळ्यात अडकला आहे. तुम्ही किती घोटाळा केला आहे? हे सगळे आम्हाला माहिती आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR