31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमुख्य बातम्यादस-याच्या पार्श्वभूमीवर सोने रु. १६०० ने घटले!

दस-याच्या पार्श्वभूमीवर सोने रु. १६०० ने घटले!

मुंबई : वृत्तसंस्था
दसरा सणाच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात आठवडाभरात जवळपास १६०० रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवर इराण आणि इस्रायल देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक सोन्याच्याकडे वळविल्याने मागणीत वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटीसह ७८,००० रुपयांच्यावर पोहोचले होते.

मात्र, गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात १६०० रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर ७६,६०० रुपयांच्या खाली असल्याने ऐन दस-याच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

शनिवारी (१२ ऑक्टोबर) दसरा आहे. त्यामुळे या सणाच्या दोन दिवस आधी हे सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेट साठी आज प्रति ग्रॅम ७४८३ मोजावे लागणार आहेत. २२ कॅरेटसाठी आज प्रति ग्रॅम ७३०३ मोजावे लागणार आहेत तर १८ कॅरेटसाठी ६०६१ रूपये मोजावे लागणार आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाला सोने खरेदी शुभ मानले जाते. यामुळे अनेक जण थोड्या फार प्रमाणात सोने खरेदी करतात. अशातच आता दसरा सणाच्या तोंडावर येऊन ठेपलेला असताना सोन्यात घसरण होत असल्याने अनेक जण खरेदीसाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. आज सोन्याचा दर हा प्रति ग्रॅम ७४८३ रुपयांपर्यंत घसरला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. सोन्याच्या दरात १६०० रुपयांची घसरण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR