29.4 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरदस-यानिमित्त रेणापुरात उसळला भक्तांचा जनसागर 

दस-यानिमित्त रेणापुरात उसळला भक्तांचा जनसागर 

रेणापूर : प्रतिनिधी
नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त येथील ग्रामदैवत आदिशक्ती श्री. रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविक-भक्तांनी पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यत मातेच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात रांग लागली होती. जवळपास एक लाख भक्तांनी शनिवारी मातेचे दर्शन घेतले. रात्री देवीची पालखीतून शहरात मिरणूक काढण्यात आल्यानंतर रेणुकादेवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता झाली.
     ग्रामदैवत श्री.रेणुका देवी मंदिराची ख्याती जागृत देवस्थान म्हणून आहे. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक या राज्यातील भाविक मातेच्या दर्शनासाठी येथे येतात. नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दहा दिवस  हा परिसर भाविक- भक्तांनी फुलून गेला होता. नवरात्र महोत्सवात रेणुका देवी ट्रस्टच्या अध्यक्षा तथा तहसीलदार मंजुषा भगत व कार्यकारी अध्यक्ष राम पाटील यांच्या हस्ते व  परंपरागत पुजारी श्रीकांत (राजू ) धर्माधिकारी यांच्या मंत्रघोषात दि.३ ऑक्टोबर रोजी  घटस्थापना करण्यात आली होती. मंदिर परिसरात व बाहेर विद्युत रोषणाई करण्यात करण्यात आली होती. तसेच तुकाई देवी मंदिराकडे जाणा-या रस्त्यावर व मंदिर परिसरात  विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नवरात्र महोत्सवात नऊ दिवस भाविकाना  पहाटेपासुन ते रात्री उशिरापर्यत दर्शन घेता आले. भाविकांना देवीचे मुखदर्शन घेता यावे म्हणून विशाल गंगाधर पुणे यांनी व विश्वस्त मंडळाने स्क्रीनवर लाईव्ह दर्शनाची व्यवस्था केली होती. लातूर- अंबाजोगाई महामार्गावर देवीच्या भक्ताकडून भाविकांना फराळाची व नाष्टयाची सोय करण्यात आली होती.
       दरम्यान रेणुकादेवी ट्रस्टच्या अध्यक्षा तथा तहसीलदार मंजूष भगत व कार्यकारी अध्यक्ष राम पाटील, विश्वस्त मंडळ, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, मंडळ अधिकारी  संजय गायकवाड, तलाठी विकास बुमणे , परोहित श्रीकांत (राजु) धर्माधिकारी व मानकरी यांच्या हस्ते रेणुकादेवी मातेचे घट उठवण्याचा कार्यक्रम दुपारी झाला. नवरात्र व पालखी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे  यांनी चौका चौकात व पालखी मार्गावर  चोख बंदोबस्त ठेवला होता.
श्री रेणुका देवी  नवरात्र व दसरा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी श्री. रेणुका देवी विश्वस्त मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राम पाटील, विश्वस्त मंडाळाचे पदाधिकारी तुकाराम कोल्हे, म.शं. हलकुडे, गुरसिद्ध उटगे, बापू गिरी, रमाकांत वाघमारे, अ‍ॅड.प्रशांत आकनगिरे, पंडित माने, लिमन पनुरे, दिलीप आकनगिरे, शहाजी कातळे, राजकुमार पुनपाळे, पुंडलीक इगे, मनोहर व्यवहारे, रावसाहेब राठोड, कुमार पाटील,अ‍ॅड. देविदास कातळे,उमेश सोमाणी,अमृतेश्वर स्वामी, शहाजी कुरे, दत्ता गोंधळी, सुरेश घडसे, सुभाष हाके यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR