नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अरविंद केजरीवाल यांच्या पराभवावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अनेक काळापासून सांगतोय, निवडणूक लढताना उमेदवारांकडे चरित्र असायला हवे, चांगले विचार राहायला हवेत. तसेच उमेदवारावर कोणताही डाग असायला नको, दारू, पैशाच्या लोभापायी केजरीवाल पराभूत झाले अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा पराभव झाला तर भाजपने चांगलीच मुसंडी मारली. विशेष म्हणजे या निवडणुकीत ‘आप’चे संयोजक तथा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांचा ३१०० पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पराभवावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दारू आणि पैशांच्या लोभापाई अरविंद केजरीवाल यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव होताना दिसत असल्याची भूमिका अण्णा हजारे यांनी मांडली आहे.
मी अनेक काळापासून सांगतोय, निवडणूक लढताना उमेदवारांकडे चरित्र असायला हवे, चांगले विचार राहायला हवेत. तसेच उमेदवाराच्या छवीवर कोणताही डाग असायला नको. पण त्यांना ही गोष्ट लक्षातच आली नाही. ते दारू आणि पैशात गुरफटून गेले. त्यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा खराब झाली आणि त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.