39.2 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeलातूरदिशा प्रतिष्ठानची बांधिलकी देते आहे विद्यार्थ्यांना आधार

दिशा प्रतिष्ठानची बांधिलकी देते आहे विद्यार्थ्यांना आधार

लातूर : प्रतिनिधी
आर्थिक परिस्थितीने अडचणीत असलेल्या होतकरु विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये या प्राजंळ भावनेने गेली अनेक वर्षांपासून लातूर येथील दिशा प्रतिष्ठान अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश शुल्क भरत असून हा आधार या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्वाचा व मोलाचा ठरत आहे. या ही वेळी ही बांधलकी जपत दिशाने पाच विद्यार्थांचे ६० हजार ५० रुपये प्रवेश शुल्क भरले. दिशाच्या या दातृत्वाप्रति विद्यार्थ्यांनी  कृतज्ञता व्यक्त केली.
दिशा प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. कार्यक्रमास सर्वश्री विवेक रेड्डी, चंद्रकांत बिराजदार, जगदीश जाधव, हंसराज जाधव, प्राचार्य निलेश राजमाने व दिशा प्रतिष्ठानचे सर्व संचालक उपस्थित होते. ग्रामीण भागातील केवळ हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबत असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देऊन चला मुलांनो घ्या भरारी हा उदात्त विचार मनाशी बाळगून गुणवंत विद्यार्थ्यांची सक्षम पिढी घडविण्यासाठी गेली तीन ते चार वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी मदतीचा हात देण्याचे काम दिशा प्रतिष्ठान करीत आहे.दिशाची ही सामाजिक बांधिलकी दिशादर्शक ठरत असून विद्यार्थ्यांना मोठा आधार देणारी असल्याची भावना मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
आर्थिक दृष्ट्या अडचणीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्राजक्ता जोशी १३ हजार, सागर तेलंगे २० हजार, अब्दुल्ला पठाण १० हजार, सुर्वण गजाकोश ७ हजार ५० व प्रविण राठोड यास १० हजार रुपये त्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी दिशा प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी देण्यात आले. प्रास्ताविकात दिशा प्रतिष्ठानचे मागदर्शक अभिजीत देशमुख यांनी दिशाच्या सामाजिक बांधिलकीचा आलेख उपस्थितांसमोर ठेवला. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत हिच प्राजंळ भावना या बांधिलकीमागे असल्याचे ते म्हणाले.  सुत्रसंचलन आनिल ढमाले  यांनी केले. आभार वैशाली यादव यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR