नागपूर : नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंगला नागरिकांनी विरोध केला आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी बांधकामाचं साहित्य फेकून देत निषेध नोंदवला. तसेच बांधकाम साहित्य पेटवून देण्यात आले. दीक्षाभूमीमध्ये विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. यात मात्र अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध होत आहे. या अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी समाजबांधवांनी कडाडून विरोध केला आहे. सोमवारी मोठ्या संख्यने समाजबांधव दीक्षाभूमीवर एकत्र आले आणि त्यांनी पार्किंगचे काम थांबवले.
आंदोलकांनी बांधकाम साहित्य आणि बोर्डाची तोडफोड केली आहे. शिवाय बांधकाम साहित्य पेटवून दिले आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दीक्षाभूमी हा आस्थेचा विषय आहे. त्यांची भावना लक्षात घेऊन विकास व्हावा. जनभावना लक्षात न घेता सरकारने आपसात भांडण लावून देऊ नये. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बौद्ध अनुयायी यांना विश्वासात न घेता श्रद्धास्थानाला धक्का लावण्याचे काम सुरू आहे. नको ते करायला जाता कशाला?
सरकारने ताबडतोब काम थांबवावे
सभागृहामध्ये बोलताना नितीन राऊत म्हणाले की, अंडरग्राऊंड पार्किंगची आज तोडफोड सुरु आहे. हा लोकांच्या भावनांचा विषय आहे. स्मारक समितीने कोणतं बांधकाम करत आहोत यांची लोकांना सुचना द्यायला पहिजे होती.. अंडरग्राउडं पार्किंग कोणासाठी करत आहेत? याचं उत्तर द्यावं, असं राऊत म्हणाले.