30.7 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeलातूरदीड लाख क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर 

दीड लाख क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर 

लातूर : प्रतिनिधी
सोयाबीनच्या घटत्या दरामुळे शेतक-यांचे अर्थकारण कोलमडले आहे. दिवसेंदिवस घटत असलेल्या दराचा विचार करुन राज्यभर हमीभाव केंद्र सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातील केंद्रांवर दीड लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. उत्पादनाच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी काही शेतक-यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक असले तरी वर्षानुवर्षे दरात मोठी घट होऊ लागली आहे. यंदा तर ४ हजार ५०० रुपयांहून अधिकचा दर मिळाला नाही. शिवाय नव्या सोयाबीनची आवक सुरु होताच ४ हजारांवर दर येऊन ठेवले आहत्ो. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणुक या मनस्थितीत शेतकरी आहेत. अशा परिस्थितीतच शेतक-यांना हमीभाव केंद्राचा पर्याय समोर असला तरी येथील अटीं-नियमांमुळे सुरुवातीच्या काळात शेतक-यांनी या केंद्रांकडे पाठ फिरवली होती. जिल्ह्यात ३५ हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. सुरुवातीच्या काळात सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक होते.
शिवाय अंतिम टप्प्यात झालेल्या पावसामुळे दर्जाही खालावला होता. हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्री केली तरी बिलासाठी महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतक-यांनी दुर्लक्ष केले तरी आता दर थेट ४ हजारांवर आल्याने शेतक-यांनी हमीभाव केंद्राचा पर्याय निवडला आहे. परिणामी या केंद्रांवर १ लाख ५० हजार क्विंटलची विक्री झाली आहे. खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणे आवशयक आहे. नोंदणीची अंतिम मुदत १२ जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक-यांनी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR