मुंबई : वृत्तसंस्था
महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरलेली दीपिका पदुकोणची ‘मोस्ट इन्फ्लूएंशल वुमन २०२५’ म्हणून निवड करण्यात आली आहे. अलीकडेच, दीपिकाने एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजवर जागा मिळवली. जिथे तिला मनोरंजन क्षेत्रातील एकमेव प्रतिनिधी म्हणून ‘मोस्ट इन्फ्लूएंशल वुमन २०२५’ च्या पॉवर लिस्टमध्ये टॉप ५० नावांमध्ये स्थान मिळाले आहे. विविध क्षेत्रांतील अनमोल योगदानासाठी तिचा हा सन्मान करण्यात आला आहे.
दरम्यान, बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी कायम चर्चेत असते. आजवर तिने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले आहे. ग्लोबल आयकॉन दीपिका पदुकोणच्या नावावर आता नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
अभिनेत्री, निर्माती, व्यावसायिक आणि मानसिक आरोग्य समर्थक अशा विविध क्षेत्रांमध्ये दीपिकाने काम केले आहे. एक महिला म्हणून कोणत्याही बंधनांना न जुमानता तिने केलेल्या कामासाठी ती सर्वांत प्रभावशाली महिला म्हणून निवडली गेली आहे.