मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता दीपिका नुकतीच ३ डिसेंबर रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित अकादमी म्युझियम गाला कार्यक्रमात सहभागी झाली होती.
दरम्यान, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. काही दिवसांपुर्वी दीपिका कॉफी विथ करणमध्ये रणवीर सोबत दिसली होती. या शोमध्ये तिने केलेल्या वक्तव्यामुळे नेटक-यांनी तिला खुपच ट्रोल केले होते. मात्र दीपिकावर ट्रोलिंगचा काहीच परिणाम होत नाही. ती तिच्या कामात व्यस्त असते. म्युझियम गाला हे ऑस्करनंतर जगातील दुसरे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका ऑस्कर सोहळ्यात दिसली होती.
तर आता वर्षाच्या अखेरीस तिने अकादमी म्युझियम गालामध्ये उपस्थिती लावली. या कार्यक्रमात तिच्यासोबत सेलेना गोमेझ, दुआ लिपा आणि इतर हॉलीवूड स्टार देखील सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात दीपिकाने जांभळ्या रंगाचा वेलवेट गाऊन परिधान केला होता. ज्यात ती खुपच सुंदर दिसत होती. तिने रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससाठी पोज दिली.
या कार्यक्रमात आमंत्रित झालेली दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे. दीपिका पदुकोणने पुन्हा जागतिक कामगिरी केली आहे.