22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरदुरुस्तीकरिता शहराच्या पुर्व भागातील काही परिसराचा वीजपुरवठा आज बंद 

दुरुस्तीकरिता शहराच्या पुर्व भागातील काही परिसराचा वीजपुरवठा आज बंद 

लातूर : प्रतिनिधी
वीजयंत्रणेच्या तातडीच्या दुरूस्ती व देखभाली करिता १३२ केव्ही. कोयना अतिउच्च दाब उपकेंद्र तसेच ११ केव्ही सिंहगड व ११ केव्ही बाभळगाव, ओसा व सुतमिल, टाऊन, सिध्देश्वर वीजवाहिनीवरील लातूर शहर शाखा क्रमांक ४ क्रमांक ५ आणि ८ अंतर्गत येणा-या परिसराचा वीज पुरवठा आज दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ तसेच काही भागाचा दुपारी  १.३० ते ५.३० वाजे दरम्यान वीज पुरवठा बंद राहील. संबंधीत वीजग्राहकांनी नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
११ केव्ही सिंहगड वीजवाहिनीवरील लातूर शहर शाखा क्रमांक  ४ अंतर्गत येणा-या कन्हेरी, पटेलनगर, माताजीनगर पोस्टल कॉलनी, आयोध्यानगर गोकुळधाम, खंदाडेनगर, खुब्बानगर सर्वानंदनगर, हाज्जूनगर, विश्वराज सिटी, संभाजीनगर, शंकरपुरनगर, कन्हैयानगरी, उज्वल धाम, नरेंद्र धाम विश्वसागर सिटी या परिसराचा वीजपुरवठा दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० या दरम्यान वीज पुरवठा बंद राहील.
११ के.व्ही बाभळगाव वीजवाहिनीवरील शहर शाखा क्रमांक ४ अंतर्गत येणा-या बस्तापुरेनगर, इस्लामपुरा, शास्त्रीनगर, इंदिरानगर अंजलीनगर, तुळजा भवानीनगर, जयभीमनगर, लकडी मार्केट, बालाजीनगर, सारोळा रोड, शिक्षक कॉलनी या भागाचा वीजपुरवठा दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० या दरम्यान व ११ केव्ही टाऊन फिडरवरील कोल्हेनगर, लेबरकॉलनी, आनंदनगर, शाहूनगर, विवेकानंद चौक, वंदना टॉकीज, गरुडचौक, करीमनगर, रहीमनगर, संत गोरोबा सोसायटी तसेच ११ केव्ही सिध्देश्वर फिडरवरील बादाडेनगर, तावरजा कॉलनी, बाभळगाव चौक, माढा कॉलनी, रुद्राक्ष नगर, आरटीओ ऑफिस, अविष्कार कॉलनी, पाचपीर नगर इत्यादी भागातील वीज पुरवठा सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान बंद राहील.
लातूर शहर शाखा क्रमांक ५ अंतर्गत येणा-या ११ केव्ही ओसा व ११ सुतमिल वीजवाहिनीवरील आदर्श कॉलनी, नारायणनगर, रामनगर, नंदी स्टॉप, एलआयसी कॉलनी, बोबेनगर, सुतमिल एरिया, ट्यूशन एरिया,
उद्योग भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंत्रीनगर, राजीव गांधीनगर, देसाईनगर, शनी मंदिर, खोपेगाव रोड, पॉलटेक्नीक कॉलेज, कापड मिल, अंबिकानगर इत्यादी भागातील वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी ५.३० या दरम्यान बंद  राहील.  सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. काम करत असताना जोराचा पाऊस आल्यास दुरूस्तीचे काम करता येणे शक्य नसल्याने काम बंद करून वीजपुरवठा पुर्ववत करण्यात येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR