17.7 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeराष्ट्रीयदेशात अब्जाधिशांच्या संख्येत झपाट्याने वाढ

देशात अब्जाधिशांच्या संख्येत झपाट्याने वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचे आंतरराष्ट्रीय बाजारातील वजन गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढत आहे. भारतातील उद्योजक देशाच्या आर्थिक वाढीसाठी मोठे योगदान देत आहेत, ज्यामुळे २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. देशात अब्जाधिशांची संख्येत विक्रमी वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतीमा चांगलीच उंचावली आहे. देशात सध्या २१७ अब्जाधीश आहेत. ज्यापैकी ८४ जणांची या यादीत नव्याने भर पडली आहे. यामुळे भारत हा सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत तिस-या क्रमांकावर पोहचला आहे.

हेन्ली अ‍ॅण्ड पार्टनर्सच्या गेल्या वर्षीच्या रिपोर्टनुसार २०२४ मध्ये जगातील टॉप ५० श्रीमंत शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली अनुक्रमे २४ व्या आणि ३७ व्या स्थानावर होते. यातूनच हे भारतातील श्रीमंत व्यक्तींची वाढती संख्या पुन्हा एकदा अधोरेखीत होते. २०१४ मध्ये भारतातील १०० अब्जाधीशांची एकूण संपत्ती गेल्या वर्षीच्या शेअर बाजारातील तेजीमुळे ३०० अब्ज डॉलरहून अधिकने वाढून १.१ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली.

यातच आता नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच फोर्ब्सने जानेवारी २०२५ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जारी केली. यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे यादीतील पहिले भारतीय ठरले आहेत त्यांची संपत्ती ९५.४ अब्ज डॉलर्स असून, जागतिक क्रमवारीत त्यांचा १८ वा क्रमांक लागतो. यासोबतच गौतम अदानी यांची संपत्ती ६२.३ अब्ज डॉलर्स असून, त्यांचा देशात दुसरा आणि जगात २५ वा क्रमांक लागतो. शिव नाडरची मालमत्ता ४२.१ अब्ज डॉलर्स असून, ते देशात तिसरे आणि जगात ३७ व्या क्रमांकावर आहेत. नुकत्याच आलेल्या आर्थिक अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे.

मुंबईने बीजिंगवर केली मात
विशेष म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबईने बीजिंगला मागे टाकत बिलीनियर्स कॅपिटल ऑफ आशियाचा मान पटकावला आहे. यासह मुंबई सर्वात वेगाने वाढत असलेले ‘बिलेनियर्स हब’ ठरत आहे. याबरोबरच हुरुनच्या रिपोर्टनुसार मुंबई जगातील तिसरे सर्वात श्रीमंत शहर बनले आहे.

सावित्री जिंदाल देशातील
सर्वांत श्रीमंत महिला
भारतीय महिला अब्जाधीशांच्या यादीत सावित्री जिंदाल आणि फॅमिली यांचा देशातील सर्वात श्रीमंत महिला असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांची संपत्ती ३८.५ अब्ज डॉलर इतकी आहे तर डी मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी हे ३१.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह २०२५ मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक ठरले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR