लातूर : प्रतिनिधी
शासन मान्य यादीवर असलेल्या आणि नसलेल्या साप्ताहिकांना जाहिरात मिळायला हव्यात असे धोरण शासनाने राबवावे, जेणेकरून लघु वृत्तपत्रावर अन्याय होणार नाही. तरीही मार्च २०२४ मध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातील साप्ताहिकांना डावलण्यात आले. हे वास्तव असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमिवर तरी दैनिक वृत्तपत्रांबरोबर साप्ताहिकांना जाहिराती देण्यात याव्यात, आदी मागण्याचे निवेदन व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्यावतीने जिल्हाधिका-यांना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या निवेदनामध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांची द्विवार्षिक पडताळणी दर पाच वर्षांनी करावी, साप्ताहिक वृत्रपत्रांची जाहिरात दरवाढ करावी, अधिस्विकृतीधारक पत्रकारांना एस.टी.महामंडळात परिवारासह सवलती देण्यात याव्यात, रेल्वे प्रवासासाठी अधिस्विकृतीधारकांना १०० टक्के सवलत सुरू करावी, पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबियासाठी आरोग्य विमा व मोफत उपचाराची सवलत देण्यात यावी, आरएनआयकडून नवीन नियमावलीनुसार लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, जिल्ह्यातील सर्वसाधारण पत्रकारांना सरंक्षण कायद्याअंतर्गत सरंक्षण देण्यात यावे व सदरील कायद्याची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, सर्वसाधारण पत्रकारांच्या पाल्यांना प्राथमिक व उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे, भ्रष्टाचार, खून, फसवणूक अशा गंभीर घटनेची माहिती पत्रकारांना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदेर्शने करून जिल्हाधिर्कायांना निवेदन देण्यात आले.
यावेळी व्हाईस ऑफ मिडीयाचे बालाजी फड, जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, शहाजी पवार, वामन पाठक, विष्णू अष्टेकर, बाळासाहेब जाधव, निशांत भद्रेश्वर, सितम सोनवणे, अभय मिरजकर, दिलीप मुनाळे, गणपती राठोड, काकासाहेब घुटे, सुधीर गंगणे, राघवेंद्र देबडवार, प्रभाकर शिरूरे, खंडेराव देडे, पी.आर.पाटील, आर.एस.रोडगे, म.वि.चलमले, मनिष हजारे, राजप्रसाद काबरा, ईस्माईल शेख, आनंद दणके, संतोष सोनवणे, अशोक कुलकर्णी, झटींगअण्णा म्हेत्रे, विशाल हालकीकर, शिवाजी पाठेकर, विनोद गुडे, सिध्दार्थ चव्हाण, ईश्वर बद्दर, वाल्मिक केंद्रे, सुधाकर फुले, गोपाळ चिताडे, शरद राठोड, मधुकर गालफाडे, साईनाथ घोणे, नामदेव शिंदे, शिवाजी यमते, निजाम शेख, बाळय्या स्वामी, सोमनाथ स्वामी, दिनेश गिरी, वी.तगलपल्लेवार आदी उपस्थित होते.