लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-क व वर्ग-ड कर्मचा-यांच्या नियमित बदल्या मंगळवारी दोन वर्षानंतर पार पडल्या. यात कर्मचा-यांची सेवा जेष्ठतेनुसार यादी तयार करून लातूर जिल्हा परिषदेच्या १०० कर्मचा-यांच्या समुपदेशनाने प्रशासकीय ३५, विनंती व आपसी झाल्या आहेत.
लातूर जिल्हा परिषदेतील वर्ग-क व वर्ग-ड कर्मचा-यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यासाठी गेल्या महिणा भरापासून हालचाली सुरू होत्या. गेल्यावर्षी सर्वसाधारण बदल्या लोकसभा व विधान सभेच्या निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे यावर्षी अनेक कर्मचारी बदल्यांसाठी इच्छूक होते. कर्मचा-यांच्या बदल्यांसाठी सेवा जेष्ठतेला महत्व देण्यात आले. कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्यासाठी १० वर्षाचा कालावधी तर विनंती बदल्यासाठी ३ वर्षाचा कालावधी ग्रा धरला गेला.
जिल्हा परिषद लातूर अंतर्गत सर्व विभागातील सर्वसाधारण बदल्या-२०२५ च्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत स्थायी समिती सभागृह जि.प.लातूर येथे समुपदेशनाद्वारे १० विभागातील २१ संवर्गातील प्रशासकिय ३५, विनंती ६२ व आपसी ३ अशा एकुण १०० कर्मचा-यांच्या प्रशासकिय, विनंती तसेच आपसी बदल्या करण्यात आल्या. सदर बदली प्रक्रिया जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांचे नियंत्रणाखाली पार पाडल्या. सदर बदली प्रक्रियेसाठी संबधीत विभागातील खाते प्रमुख तसेच सर्व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी यांचे उपस्थितीत १०० कर्मचा-यांच्या प्रशासकिय व विनंती बदल्या करण्यात आल्या व संबधीतांना पदस्थापनेचे आदेश पारीत करण्यात आले.