32.9 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे

पुरावे सादर करत अंजली दमानियांची मागणी

बीड : प्रतिनिधी
बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे हे आधीच अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांचे बाड सादर करत मुंडेंवर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकंदरच धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीनच वाढत चालल्याचे दिसत आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी केलेल्या विविध घोटाळ्यांचे पुरावे अंजली दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन सादर केले. वर्षभराच्या कालावधीत या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रिपदावर ठेवण्याची गरज आहे का, याचा मुख्यमंत्र्यांनी गंभीर विचार करावा, असे म्हणत काहीही झाले तरी आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

एवढेच नव्हे तर भगवानगडाने मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मागणी करावी अशी मागणीही दमानिया यांनी केली. लवकरच पुरावे घेऊन आपण भगवानगडावर जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाईड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅग यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत दमानिया यांनी अनेक पुरावेही सादर केले. अंजली दमानिया यांनी तत्कालीन कृषी खात्यातील घोटाळ्याची कागदपत्रं प्रसारमाध्यमांसमोर मांडताना धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. नॅनो युरिया १८४ प्रत्येक लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलिटरची बॉटल ९२ रुपयांना मिळते. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले. तेव्हा ती बॉटल २२० रुपयांत घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयांना मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयांप्रमाणे घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने बॉटल घेतल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

कॉटन स्टोरेज बॅग ६ लाख १८ हजार घेतल्या. काही दिवसापूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी २० बॅगा घेतल्या. ५७७ रुपयाला. पण मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयाला घेतल्या. ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी रुपये सरळ सरळ गेले. मी ऑनलाइनच्या रेटने म्हणतेय. बल्कने पकडलं तर २० टक्के अधिक आहे. इतके महान कृषी मंत्री आहेत. एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे. मुख्यमंर्त्यांनी गंभीर विचार करावा, अशी मागणी दमानिया यांनी केली.

भगवान गडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा
हे सर्व पुरावे सादर करत आता तरी मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीमाना घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली. तसेच भगवान गडाने आता तरी त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा. आता तरी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी ही भगवान गडाला विनंती आहे, असेही दमानिया म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR