रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील धवेली येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आहे. माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी रविवारी धवेली ग्रामस्थांशी संवाद साधला. स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रशासनाकडे व शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
धवेली येथे स्मशानभूमी च्या प्रश्नासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रेतासह काही ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मातंग समाजासाठी समशानभूमी ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वारंवार करूनही प्रशासनाने ते अद्याप मान्य केली नाही अशी नाराजी ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त करत आहेत.
लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आंदोलनाची तत्काळ दखल घेतली. धवेली येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या मदतीने स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरुपी कसा मिटेल यासाठी प्रयत्नशील राहीन, असेही माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले.