अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील सरकार चोरले आहे. तसेच धारावीची जमीन अदानींना देण्यासाठी सरकार चोरण्यात आले, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
अमरावतीमध्ये आज राहुल गांधींची प्रचार सभा होती, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघात केला आहे.
आमदार कोणाच्या बोलण्यावरून खरेदी केले आहेत, हे सर्वांना माहिती असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. तसेच सरकार चोरी करण्यासाठी बैठका केल्या जात आहेत. मोदी, शहा आणि अदानींच्या या बैठकांमध्ये आमदार खरेदीचे प्लॅनिंग करण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच धारावीच्या जमिनीचा सौदा झाला आहे. त्यासाठी कोटी रुपये देऊन आमदारांना विकत घेतल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.
तसेच ते म्हणाले, धारावीची जमीन तुम्ही घेता मग कुलाब्याची जमीन का घेत नाही? कारण तिथे श्रीमंत लोक राहतात म्हणूक का? जिथे दलित, ओबीसी आणि आदिवासी लोक राहतात, त्या ठिकाणांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. तसेच मी जेव्हापासून जमिनींवर बोलायला लागलो, तेव्हापासून अदानी आणि अंबानी माझ्या मागे लागल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच माझी प्रतिमा बदनाम केली जात असल्याचे यावेळी ते म्हणाले.
तुमच्या जमिनी त्यांना पाहिजेत तसेच तुमचे जंगल त्यांना पाहिज. तसेच ते तुमच्याकडून सर्व घेऊ पाहत आहेत. तसेच २५अब्जाधीश आहेत. त्यांचे १६ लाख कोटी रुपये या सरकारने माफ केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. एक लाख कोटी रुपये अदानीला धारावीत दिले जाणार आहेत, त्यांना वाटतं ते सहज शक्य होईल. पण ते सहज शक्य होणार नाही. राहुल गांधी इथे उभा आहे, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.