22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवधाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार

धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार

धाराशिव : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीत धाराशिव जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे, अशा विश्वास काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी माजी आमदार कुणाल चौधरी यांनी व्यक्त केला.

व्यासपीठावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे, प्रदेश सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे, सचिव फरीद देशमुख, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डॉ. स्मिता शहापुरकर, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, विजयकुमार सोनवणे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती सपाटे, आयुब पठाण, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, मुकुंद डोंगरे, प्रकाश चव्हाण हजर होते.

पुढे बोलताना कुणाल चौधरी म्हणाले, कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्यरत राहावे येणारा काळ हा आपलाच असेल असा संदेश दिला. यावेळी तुळजापूर आणि उमरगा या दोन्ही जागा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढाव्यात व निष्ठावंत कार्यकर्त्यांस संधी द्यावी, असा ठराव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी मांडला यास सर्व उपस्थितांनी एकमताने अनुमोदन दिले. यावेळी माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन राजाभाऊ शेरखाने यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

बैठकीला ज्येष्ठ नेते उस्मान कुरेशी, अशोक बनसोडे, जावेद काझी, सुरेंद्र पाटील, विजयकुमार वाघमारे, अनंत घोगरे, प्रभाकर लोंढे, कफिल सय्यद, अभिमान पेठे, अमोल कुतवळ, अनिलकुमार लबडे, तनुजा हेड्डा, सुवर्णा ढवळे, अभिषेक बागल, शहाजी मुंडे, सुनील बडूरकर, मिलिंद गोवर्धन, विजय मुद्दे, सलमान शेख, प्रभाकर डोंबाळे, स्वप्नील शिंगाडे, दादा गायकवाड, सौरभ गायकवाड, भारत काटे, संकेत पडवळ, बाबा घुटे, रोहित पडवळ, अश्रूबा माळी, संजय देशमुख, महादेव पेठे, भूषण देशमुख, संतोष पेठे, सचिन धाकतोडे, संजय गजधने, दिगंबर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR