लातूर : प्रतिनिधी
तुम्ही गुंतवणुक केलेल्या रकमेवर अधिक नफा मिळवून देतो, असे अमिष दाखवून अॅप अॅडमीनने ७९ लाख ६६ हजार ६४९ रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी लातूरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील औसा रोडवरील सरस्वती कॉलनीत राहणारे किरण नावाचे एक व्यापारी त्यांना टेलीग्राम ग्रुप यावरुन फोन आला.
त्या गु्रपच्या अॅडमीनने शेअर खरेदी-विक्री करण्याकरीता आयबीआरपीआरओ नावाच्या अॅपवर पैसे भरा, तुम्हाला अधिकाधिक नफा मिळवून देऊ, असे भासविले. किरण यांनी त्या अज्ञात अॅडमीन ग्रूप संचालकाच्या बोलण्याला बळी पडून १३ जून ते ५ जुलै २०२४ या दरम्यान वेळोवेळी ७९ लाख ६६ हजार ६४९ रुपये भरले. तेव्हा यात आपली फसवणूक झाली आहे, असे कळताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात अॅपच्या अॅडमीन चालकाविरुद्ध साबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपस शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर हे करीत आहेत.