27.8 C
Latur
Saturday, August 23, 2025
Homeलातूरनवाडे यांची बैलजोडी सलग तिस-यांदा प्रथम

नवाडे यांची बैलजोडी सलग तिस-यांदा प्रथम

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथे बैला पोळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोरख पांडुरंग नवाडे यांची सलग तिस-यांदा हॅट्रिक करीत बैल जोडी प्रथम आल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने बक्षीस देऊन गौरव करण्यात आला .  निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील ग्रामपंचायतच्या वतीने दरवर्षी  बैलपोळा निमित्त प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या बैलजोडींचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षी प्रथम  गोरख पांडुरंग नवाडे, द्वितीय  घनश्याम मालपाणी व तृतीय अशोकराव बोंडगे तर घोड्यामधून उत्तेजनार्थ गोपणे यांच्या घोड्यांना बक्षीस देण्यात आले. प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या बैल जोडीचे ग्रामपंचायतीच्या वतीने बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी  माजी सरपंच मोहनराव भंडारे , तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव भंडारे, उपसरपंच महेश भंडारे, युवा नेतृत्व बालाजी भंडारे, ग्रामपंचायत सदस्य हाजी सराफ,दाऊद मूल्ला, माजी मुख्याध्यापक व्यंकट पाटील, खमर शेख, व्यंकट मरगणे, व्यंकट भंडारे, जितू पाटील, अलीम पठाण, विलास कांबळे,अकबर पठाण, पंचाक्षरी, दिलीप  कत्ते व ग्रामपंचायत  कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR