लातुर प्रतिनिधी : बाभळगाव येथील निवासस्थानी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
हनुमंत पाटील बेटमोगरेकर आणि सहकाऱ्यांची भेट घेतली. नांदेड तसेच लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा गतिमान करण्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत
चव्हाण यांच्या प्रचार यंत्रणेसंदर्भात यावेळी माहिती घेतली. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचार यंत्रणेत काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याबाबत यावेळी विस्तृत चर्चा झाली.
याप्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, राजन देशपांडे, सुरेश पाटील बेळीकर, शौकतखा पठाण, बालाजी पंडागळे, शरद पवार, शहाजी नळगे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध
पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.