36.6 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeलातूरनाथजोगी समाजातील ७२ मुलांना नाथदिक्षा

नाथजोगी समाजातील ७२ मुलांना नाथदिक्षा

लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ, गोरक्षनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने पवित्र नाथदिक्षा (कानचिरा) सामुहिक कार्यक्रम येथील श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानात दि. १२ मे रोजी पार पडला.  यामध्ये ७२ मुलांनी विधीवत पूजा केली व  श्री श्री श्री १००८ महामंडळलेश्वर महास्वामी शिवरुद्रानंद महाराज आणि श्री शिवनाथ महाराज, राजेंद्र देवगण या धर्मगुरुंनी त्यांना नाथदिक्षा दिली. याप्रसंगी १६ गरजू विद्यार्थ्यांना मुंबई अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जयाजी नाथ, राष्ट्रीय महासचिव विश्वनाथ नाथ,  खजिनदार डी. इ. हिरडे, योगेश बर्वे, शिवराम डवरी, डॉ. डी. बी. इंगळे, शांतीनाथ जाधव, संजय चव्हाण, सुरेश जाधव, काशीनाथ गोसावी, दत्तात्रय सुर्यवंशी, रविंद्र जाधव जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मधुरकर, धर्मनाथ रिद्दिवाडे, गोरख जोगी, अमोल चव्हाण, जगन्नाथ कदम, शंकर चव्हाण, परमेश्वर गायकवाड, प्रेमनाथ चव्हाण, अमर चव्हाण, गोपीनाथ मधुरकर, रवी पवार, रविद्रनाथ जाधव, सिद्धनाथ रिद्दिवाडे, राजेंद्र गायकवाड, संतोष रोकडे, विवेकांनद योगी,  लहु जाधव, नागनाथ जोगी, किरण सुर्यवंशी, बालाजी चव्हाण,  ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विठ्ठलनाथ केदारनाथ चव्हाण आदींनी पुढाकार घेतला.
समाजातील सुवर्णा पवार, ज्योती सूर्यवंशी, ज्योती मधूरकर, आरती रिद्धीवाडे, आश्वीनी पवार, नीलम चव्हाण, नम्रता चव्हाण, नीता जोगी, स्वरुपा योगी, सविता कदम, रुपाली जोगी, सुवर्णा चव्हाण, सारिका रोकडे, प्रतिभा योगी, प्रियंका चव्हाण, पल्लवी योगी,  तुळशी योगी आदि महिलांनी महामेळावा यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले. महामेळाव्यास महाराष्ट्रातून असंख्य नाथबांधव व महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव क्षीरसागर, सूत्रसंचालन रामनाथ जाधव तर आभार सदानंद योगी यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR