नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेले वादग्रस्त धार्मिकस्थळ हटवण्यात आले. त्यातच आदल्या रात्री परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. ४०० हून अधिक जणांच्या जमावाकडून रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी आता काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. ५७ संशयितांच्या मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत.
दरम्यान, १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर नाशिक महापालिकेने कारवाई केली. त्यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर आता १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कठोर कारवाईला सुरुवात झाली असून व्हायरल व्हीडीओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.