निलंगा : प्रतिनिधी
निलंगा शहरातील अनेक भागातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्ते चिखलाने माखले आहेत म्हणून नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी शहरवासीयातून मागणी होत आहे. पालिका प्रशासन व लोकपतिनिधीच्या दुर्लक्षाने शहरातील पांचाळ कॉलनीसह अनेक भागातील रस्ता चिखलमय झाला आहे .
निलंगा पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने शहरातील अनेक कॉलनीतील रस्ते चिखलानी माखले गेले आहेत . तर पांचाळ कॉलनी भागातील बसवेश्वर नगर येथिल अनेक वर्षे झाले रस्त्यांची दुरावस्था पहायला मिळत आहे . काही भागात रस्त्यांचे नूतनीकरण झालेले आहे मात्र काही ठिकाणी ना रस्ता ना नाली अशी रस्त्याची दयनीय परस्थितिी झाली आहे .याकडे नगरपालिका व लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
या भागातील स्वामी पिठगिरणी ते भगवान गायकवाड यांच्या घरापर्यंत च्या रस्त्याची दुरावस्था पहायला झाली आहे . त्यात पाऊस पडला की जीव मुठीत घेऊन रस्त्यावर प्रवास करावा लागतं आहे गल्लीतील नागरिकांनी याविषयी प्रशासनावर रोष व्यक्त करत तात्काळ रस्ता दुरुस्त करून नवीन नाली बांधकाम करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.