19.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरनिलंगा येथे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढा 

निलंगा येथे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढा 

निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीत तेरा उमेदवार निवडणूक ंिरगणात उभे आहेत . मात्र काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके व भाजपा महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात थेट दुरंगी लढत होत असल्याने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा चालू असल्याचे राजकीय जाणकारातून चर्चिले जात आहे. काँग्रेस व भाजपाच्या एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी धडाडू लागल्या आहेत.
निलंगा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके व भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात चुरशीची लढत होत असून निवडणुकीत प्रचार यंत्रणेने रंग भरला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर हे या मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केले आहेत. यामुळे धनाने बलाढ्य असलेले हे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. ते गत तीस वर्षापासून गोरगरीब जनतेच्या अडचणीला धाऊन जात केलेले जनसेवेचे पाठबळ घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके व भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर हे मतदार संघात गावागावात संवाद दौरे काढून मतदार संघ ंिपंजून काढत आहेत.
काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचार सभेला मतदार गर्दी करत त्यांना बळ देत असल्याने जनशक्तीचा मतदारसंघात बोलबाला जास्त असल्याचे दिसते. तर आमदार निलंगेकर यांनी या मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केले मात्र विकासाच्या बाबतीत वनवा असल्याने नाराजीचा सूर मतदारातून दिसून येत आहे तर काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके हे सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील संघर्षशील लढवय्या तरुण असल्याने ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे.  अभय साळुंके यांना जनतेचा वाढता पांिठबा पाहता या लढाईत जनशक्ती ही आजमितीला सरस ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR