निलंगा : प्रतिनिधी
निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणा-या जन सन्मान संवाद यात्रेअंतर्गत बेंडगा येथे जनसन्मान संवाद यात्रा पार पडली. यावेळी ग्रामस्थाच्या वतीने युवा नेते अरंिवंद पाटील निलंगेकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
गावभेटी दरम्यान शेकडो ग्रामस्थांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अरंिवंद पाटील निलंगेकर यांचे स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संवाद यात्रा ग्रामदैवत मारुतीरायाच्या मंदिरात पोहोचली. मारुतीरायाचे दर्शन घेऊन संवाद बैठकीला सुरुवात करण्यात आली. गावच्या सरपंच मोहरताई धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये गावाच्या विकास योगदान देणारे ज्येष्ठ व्यक्ती, सरकारी योजनेतील लाभार्थी नागरिक व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिला भगिनी यांचा सत्कार करण्यात आला. गावात पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण व नव्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी अरंिवंद पाटील निलंगेकर म्हणाले की, निलंगा मतदारसंघ आज महाराष्ट्राच्या नकाशावर शुक्र ता-यासारखा चमकत आहे. त्याचा गौरव वाढवून विकसित मतदारसंघाच्या यादीत त्याला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविक सत्यवान धुमाळ व सूत्रसंचलन परमेश्वर शिंदे यांनी केले.
यावेळी तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, गट विकास अधिकारी सोपान अकेले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेषेराव ममाळे, संपत पाटील, दत्ता मोहळकर, तम्मा माडीबोने, सुमित इनानी, दिगंबर सूर्यवंशी, राम काळगे, युवराज पवार, नयन माने, उपसरपंच वैजीनाथ तळबुगे, ओमजी गिरी, अनंत धुमाळ, शिवाजी धुमाळ, प्रमोद पाटील, गोंिवद कारभारी, गुणवंत गिरी, लक्ष्मण मंजुळे, प्रकाश गायकवाड, संतोष धुमाळ, विष्णू धुमाळ, तानाजी मंजुळे, मारुती धुमाळ, जलील सय्यद, अमृत धुमाळ, गुलाबजी गिरी, बिभीषण जगताप, समीर सय्यद आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.