27.1 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeलातूरनिलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण 

निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण 

निलंगा :  प्रतिनिधी येथील ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर हे संपूर्ण मराठवाड्याचे भूषण आहे. या मंदिराचे काम पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली होत आहे, राज्य करणारा नेता हा धार्मिक आणि परमार्थिक असला तरच मंदिरासारखे काम त्यांच्या हातून होते असे काम आमदार संभाजीराव पाटील  निलंगेकर यांनी सुरू केले असून यासाठी निधीची कसलीच कमतरता पडू देणार नाहीत असे अभिवचन पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले .  दि २६ सप्टेंबर रोजी येथील ग्रामदैवत निळकंटेश्वर मंदिरात शहरातील प्रमुख नागरिकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रथम औसेकर महाराज व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंदिराची पाहणी केली व पुरातत्व विभागाच्या कर्मचा-यांशी चर्चा केली.
यावेळी मधवाचार्य महाराज ंिपपळे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष मनोज कळळे, पुरातत्व विभागाचे मुकुंद जाधव, शेषेराव ममाळे, मुख्याध्यापक दत्ता शाहीर, संजय हलगरकर, वीरभद्र स्वामी, सुनिल पंढरीकर चेरमन दगडू सोळुंके, दत्ता मोहळकर, जयंत देशपांडे , सुधीर पाटील , ंिपटू पाटील, शंकर भुरके ,शरद पेठकर, किशोर लंगोटे, सुमित इनानी, अशोक शेटकार, मंचक पांचाळ , नीलकंठ पेठकर, किशोर जाधव यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.
ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, या मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे त्यामुळे धोंडा किती दिवस टिकेल हे समजेल मंदिराला क्रॅक गेले आहेत. जो सिमेंटचा खांब दिला आहे त्याच्या सळया उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे या मंदिराचे संपूर्ण काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली व्हायला पाहिजे. आगामी काळात काशीचे जगद्गुरु यांना बोलावून त्यांनी सूचविल्याप्रमाणे बदल करून काम करावे लागेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचे काम करण्यात येईल त्याबाबत निलंगा शहरातील जनतेने आपल्या काही सूचना असतील तर सांगाव्या असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR