25.6 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeलातूरनिवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून प्रचारासाठी आयोजित कार्यक्रम, सभेत वापरल्या जाणा-या वस्तूंचे दर निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षामार्फत तयार करण्यात आलेले विविध बाबींचे दरपत्रकाविषयी यावेळी चर्चा करुन दर निश्चित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी न-हे, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे, निवडणूक संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी राजेंद्र नागणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना, उमेदवारांना प्रचारासाठी मंडप, स्पीकर, वाहने यासह विविध बाबींची आवश्यकता भासते. या खर्चाचा समावेश संबंधित राजकीय पक्ष अथवा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात केला जातो. त्यामुळे प्रत्येक बाबींचे दर जिल्हास्तरीय निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षामार्फत निश्चित करण्यात आले आहेत. या दरांबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करून, त्याबाबत त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले.  यावेळी झालेल्या चर्चेनुसार आणि प्राप्त योग्य सूचनानुसार विविध बाबींचे दरपत्रक अंतिम  करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR