21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोग आम्हाला शहाणपणा शिकवतो

निवडणूक आयोग आम्हाला शहाणपणा शिकवतो

मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक आयोग आम्हाला शहाणपणा शिकवतो, आचारसंहिता दाखवितो . निवडणूक आयोगाचे भाजपाचे लोक असे कोट्यावधींचे व्यवहार करत आहेत. मत विकत घेत आहेत. कशी होणार निवडणूक? असा सवाल करत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला आहे.

दरम्यान, पुण्यातील खेड-शिवापूर टोलानाक्यावर जप्त करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या रोख रक्कमेसंदर्भात खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. ही रक्कम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाठवण्यात येत होती, असा आरोप राऊतांनी पत्रकारांशी बोलताना केला. टोलनाक्यावर १५ कोटी घेऊन दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक गाडी आमच्या लोकांनी पकडून दिली असली तरी १० कोटी असलेली गाडी निश्चित स्थळी पोहचल्याचा दावा करत राऊत यांनी निवडणूक आयोगावरही संताप व्यक्त केला आहे.

तसेच पुढे बोलताना या प्रकरणामध्ये पोलिसांनाही मॅनेज केल्याची शक्यता राऊतांनी व्यक्त केली. पोलिसांच्या तोंडात सुद्धा बोळा कोंबला असेल. १५ कोटींपैकी १० कोटी गेले. त्यातला काही गोळा कोंबला असेल, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. आमच्याकडे हजार दोन हजार सापडले तरी आमच्यावर कारवाई करतात. पण पाच पाच कोटी, दहा दहा कोटी खातात त्यांच्याकडे निवडणूक आयोग कानाडोळा करत आहेत, असं राऊत म्हणाले.

राऊतांनी मांडला २२५ कोटींचा हिशोब!
मी आठ दिवसांपूर्वी सांगितले होते की एकनाथ शिंदेंच्या आमदारांना आणि इतर काही लोकांना ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम पोहचवण्याची तयारी झाली आहे. १५-१५ कोटींची पहिली इन्स्टॉलमेंट पाठवली जात आहे. सांगोल्यातील गद्दार आमदाराचे १५ कोटी जात होते. त्याच आमदाराचे लोक गाडीमध्ये होते. एक फोन आला त्या गाड्या सोडल्या. मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून कशाप्राकारे पैशांचे वाटप केले जात आहे. राऊत यांनी १५० आमदारांना प्रत्येकी १५ कोटी म्हणजेच २२५ कोटींचं वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

७७६ तक्रारी दाखल : निवडणूक आयोग
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून आचारसंहितेचा भंग करणा-या जवळपास ७७६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर ३१ कोटींचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR