23.4 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeलातूर‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात; लातूरचे दोन शिक्षक ताब्यात

‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात; लातूरचे दोन शिक्षक ताब्यात

लातूर : प्रतिनिधी
‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकार प्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी रात्री उशिरा लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. लातूर येथील सरकारी शाळेत शिकवणा-या संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखान पठाण अशी एटीएसच्या नांदेड युनिटच्या पथकाने ताब्यात घेतलेल्­या शिक्षकांची नावे आहेत, असे वृत्त हाती आले आहे.

लातूरम्ध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राज्यभरातून येतात. याचाच गैरफायदा घेऊन नीट परीक्षेचा पेपर फोडणारे रॅकेट लातूरमध्ये चालत असावे, असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे आता ताब्यात घेण्यात आलल्या शिक्षकांकडून काही माहिती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

देशभरात गाजत असलेल्या नीटचे (नॅशनल टस्टिंग एजन्सी) धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात वेगाने घडामोडी सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने नीट परीक्षा २०२४ मधील गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणात पहिली विकेट पडली आहे. नीटचे महासंचालक सुबोधकुमार सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदीपसिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आहे. गुजरात, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि बिहारनंतर या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात आले आहेत. या प्रकरणात लातूरच्या खासगी कोचिंग क्लासमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे.

लातुरात एटीएसचा दोन ठिकाणी छापा
लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राज्यभरातून येतात. याचाच गैरफायदा घेऊन नीट परीक्षेचा पेपर फोडणारे रॅकेट लातूरमध्ये चालत असावे, असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे आता ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांकडून काय माहिती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. एटीएसच्या पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापा टाकत या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही शिक्षक हे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक आहेत .

संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोन शिक्षकांची नावे आहेत. संजय जाधव हे चाकूर तालुक्यातल्या बोथी येथील रहिवासी आहेत तर सोलापूर जिल्ह्यातल्या टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक आहेत. तर जलील पठाण हे लातूर जवळच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवितात.

दोषींवर कठोर कारवाई करणार : शिक्षणमंत्री प्रधान
आम्ही पारदर्शक आणि विनात्रुटी परीक्षेसाठी कटिबद्ध आहोत. परीक्षा सुधारणांबाबत एक पॅनल तयार करण्यात आले आहे, अधिका-यावर कठोर कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्­पष्­ट केले आहे.

‘नीट’ परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांबद्दल आणि १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्क्सबद्दल विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. नंतर ग्रेस गुण काढून टाकण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR