नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगात असा एकही देश नसेल जिथे मद्यप्राशन केलं जात नाही. अनेक देशांच्या महसूलात सर्वात मोठा वाटा मद्याचाच आहे. एवढेच काय तर कोरोना काळात भारताच्या अर्थव्यवस्थेलाही मद्यप्रेमींनीच हातभार लावला. जगातील सर्वात मोठी बिअर उत्पादन कंपनी ब्रुअरी AB InDev ने डिसेंबर तिमाहीचे निकाल नुकतेच सादर केले. कंपनीची कमाई बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. पण, कंपनीची विक्री वार्षिक आधारावर घसरली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार २ मोठ्या बाजारपेठांमध्ये बिअरची मागणी कमी झाली आहे.
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निकालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा महसूल ३.४ टक्क्यांनी वाढून १४.८४ अब्ज डॉलर झाला आहे. पण, एलएसईजी विश्लेषकांनी कमाईत २.९ टक्के घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. या कारणास्तव, लंडन मार्केटमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात स्टॉक ८ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. कंपनीच्या ब्रँड्समध्ये Budweiser, Corona Afd¯f Stella Artois यांचा समावेश आहे.
बिअर कंपनीचा नफा घटला
कंपनीच्या नफ्याचे एकूण प्रमाण तिमाहीत १.९ टक्के आणि संपूर्ण वर्ष २०२४ मध्ये १.४ टक्क्यांनी कमी झाले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, चीन आणि अर्जेंटिनामधील मागणीत घट हे याचे प्रमुख कारण आहे. कंपनीचे सीईओ म्हणाले की, उद्योगातील कमकुवतपणामुळे ग्राहकांच्या भावना क्षीण झाल्या आहेत. त्यामुळे या दोन बाजारातील विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे. समूहाच्या बिअर उत्पादनांच्या मागणीत घट झाल्यामुळे व्हॉल्यूममध्ये घट झाली आहे. जे नॉन-बिअर ब्रँडपेक्षा कमी आहे. पण, कंपनीने सांगितले की बाजाराचे संकेत मजबूत असल्याने भविष्यात व्यवसायात सकारात्मक वाढ होईल.
नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्सचा वापर?
कंपनीचे सीईओ म्हणाले की, त्यांच्यासाठी सर्वात मोठी चिंता ही फॉरेक्स आहे. त्यांचा इशारा डॉलरमधील वाढीकडे आहे. टॅरिफच्या व्यवसायावर विशेष परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. सध्या, जागतिक पेय बाजार अनेक आव्हानांना तोंड देत आहे, लोकांमध्येही दारुचा खप कमी झाला आहे. हे पाहता कंपन्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्सचा वाटा वाढवत आहेत. अल्कोहोलचा वापर कमी होणे हा जागतिक ट्रेंड आहे. या क्षेत्रातील कंपन्यांसाठी ही चांगली संधी असल्याचेही त्यांनी म्हटले.