28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeराष्ट्रीयनोटबंदी काळ््या पैशाचे पांढ-यात रुपांतराचा मार्ग

नोटबंदी काळ््या पैशाचे पांढ-यात रुपांतराचा मार्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती नागरत्न यांनी एक खळबळजनक भाष्य केले आहे. नोटाबंदी हा काळ््या पैशाचे रुपांतर पांढ-या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे आता वेगळीच चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत यावरून गदारोळ होऊ शकतो. एका खटल्यावर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरतन यांनी म्हटले की, नोटाबंदीच्या आदल्यादिवशी नव्या चलनाची चर्चा सुरु झाली आणि दुस-या दिवशी नोटाबंदी झाली. जर भारताला कागदी चलनाकडून प्लास्टिक मनीकडे जायचे होते तर त्यासाठी निश्चितच नोटाबंदी हा पर्याय नव्हता. त्यामुळे ज्या पद्धतीने नोटाबंदी करण्यात आली ते योग्य नव्हते.

ही कायदेशीर निर्णय प्रक्रिया नव्हती. ज्या घाईमध्ये हे केले गेले ते योग्य नव्हते. कारण काही लोक म्हणतात की तत्कालीन अर्थमंत्र्यांनाही या निर्णयाची माहिती नव्हती. त्यामुळे काळ््या पैशाचे पांढ-या पैशात रूपांतर करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, असे मला वाटते. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या कार्यवाहीचे काय झाले, आम्हाला माहिती नाही. त्यामुळे सामान्य माणसाला झालेल्या त्रासामुळे मला ख-या अर्थाने अस्वस्थ वाटले आणि म्हणून मी विवेक नारायण शर्मा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात असहमती दर्शवली, अशी भूमिकाही यावेळी न्या. नागरत्न यांनी मांडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR