21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeधाराशिवपरंडा तालुका कृषी कार्यालयातील कंत्राटी कर्मचा-याला लाच घेताना पकडले

परंडा तालुका कृषी कार्यालयातील कंत्राटी कर्मचा-याला लाच घेताना पकडले

धाराशिव : प्रतिनिधी
परंडा तालुका कृषी कार्यालयातील कंत्राटी कर्मचा-याला दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. हि कारवाई दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी परंडा येथे करण्यात आली. विकास विजयकुमार बनसोडे असे लाच घेणा-या कर्मचा-याचे नाव आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विकास विजयकुमार वाघमारे हे परंडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. परंडा तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या भावाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून केळीची लागवड केलेली आहे. या कामाचे कुशल बील ऑनलाईन अपलोड करण्यासाठी आरोपी विकास बनसोडे याने तक्रारदाराकडे २ हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एसीबी पथकाने दि. २१ ऑगस्ट रोजी परंडा येथे सापळा लावला होता. तक्रारदाराकडून २ हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वत: स्विकारताना विकास बनसोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक विकास राठोड, पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सापळा पथकामध्ये पोलीस अमलदार इप्तिकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके, चालक दत्तात्रेय यांनी केली. कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR