बोरी : येथून जाणारा परभणी- जिंतूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२चे बोरी गावामध्ये अजूनही काम चालूच आहे. या राष्ट्रीय महामार्गावर नाली पासून खूप अंतर सोडल्यामुळे काही रिकामी ठिकाणी जागा पकडण्यासाठी भांडण सुद्धा होत आहेत. शहरातील बसस्थानक, कौसडी फाटा, टेलिफोन एक्सचेंज आदि ठिकाणी झालेल्या अतिक्रमणाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.
परभणी- जिंतूर राष्ट्रीय महामार्ग बोरी गावामध्ये रुंदीला कमी केल्यामुळे रोडच्या बाजूने शिल्लक जागा मोकळी सुटलेली आहे. या मोकळ्या जागेमध्ये जाळी लावून उद्यान करावे. कारण या सुटलेल्या रिकाम्या जागेमध्ये अतिक्रमण करणा-या लोकांची मोठी गर्दी होत आहे.
शहरातील बस स्थानक, कौसडी फाटा, सरकारी गोदाम, सरकारी दवाखाना, पाण्याची टाकी जवळ, पावर हाऊस, टेलिफोन एक्सचेंज ऑफिस अशा ठिकाणी झालेली अतिक्रमणामुळे वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतू सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे या अतिक्रमणाकडे राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे अशी मागणी नागरीकातून जोर धरीत आहे.