17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपरळीत धनुभाऊंचीच हवा; बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय

परळीत धनुभाऊंचीच हवा; बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय

बीड : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून पहिल्या फेरीत परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यांचा मोठा विजय झाला आहे, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय धनंजय मुंडेंचा झाला आहे. धनंजय मुंडेंना ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते.

तर, महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अगदी निवडणूक मतदानाच्या दिवशी परळी मतदारसंघात अनेक घटना घडल्या, ज्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा परळीकडे वेधले गेले.

बोसग मतदान झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी काही मतदारसंघात फेरमतदानाची मागणी केली आहे. त्यामुळे, परळीचा निकाल काय असेल याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर मराठा उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी ६५०० मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजप महायुतीच्या पंकजा मुंडेंचा पराभव केला होता. मात्र, त्यांना परळी विधानसभा मतदारसंघात ७० हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्य होतं. त्यामुळे, धनंजय मुंडेंचं पारडं जड आहे.

राज्याच्या राजकारणात बीड जिल्हा यंदा मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान राहिला आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला याचा चांगलाच फटका बसला होता. मराठवाड्यातील ८ लोकसभा मतदारसंघांपैकी ७ मतदारसंघात भाजप महायुतीचा पराभव झाला. त्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातही भाजपच्या बड्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर मराठा उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी ६५०० मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत येथे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यात एकूण ६ मतदारसंघ येतात. त्यामध्ये, परळी आणि माजलगावातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यात परळी, बीड, केज, माजलगाव, गेवराई आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. तर, बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे समर्थक अनिल जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच, मराठा आरक्षण चळवळीतील नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही निवडणूक लढवली. त्यामुळे येथील लढतींकडे राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून बीड जिल्ह्यातील चित्र लवकरच स्पष्ट होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR