36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeराष्ट्रीयपहिल्या खाजगी रेल्वेला ७० लाखांचा नफा!

पहिल्या खाजगी रेल्वेला ७० लाखांचा नफा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रेल्वे नेहमीच भारतीय अर्थव्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीचा कणा राहिली आहे. लोकांना जोडण्याचे आणि दूरपर्यंत माल वाहतूक करण्याचे काम रेल्वेने कायम केले आहे. एका अहवालानुसार तेजस एक्स्प्रेसने या वर्षी ऑक्टोबरपर्यंत ७० लाख रुपयांचा नफा कमावला आहे. पहिल्या महिन्यातच एवढी घसघशीत कमाई झाली तर तिकिटांच्या विक्रीतून ३.७० कोटी रुपये कमावले आहेत. देशातील पहिल्या खासगी ट्रेनची ही आजवरची सर्वात मोठी कमाई आहे. त्यामुळे रेल्वेसाठीचे हे शुभ संकेत असल्याचे मानले जात आहे.

भारतीय रेल्वेने खानपान आणि पर्यटन कार्पोरेशनच्या लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस, रेल्वेच्या ५० रेल्वे स्टेशनला जागतिक मानकांच्या अनुरुप विकसित करण्याच्या योजनेचा हिस्सा आहे. तसेच खासगी प्रवासी ट्रेन ऑपरेटरांना आपल्या नेटवर्कवर १५० ट्रेन चालवण्याची परवानगी देत आहे. ५ ऑक्टोबर रोजी परिचालन सुरू झाल्यानंतर ही ट्रेन सरासरी ८०-८५ टक्के प्रवाशांसोबत चालली आहे. ५ ऑक्टोबरपासून २८ ऑक्टोबरपर्यंत (ट्रेन आठवड्यातून ६ दिवस चालते, एकूण २१ दिवस) आयआरसीटीसीद्वारे ट्रेन चालवल्याने सुमारे ३ कोटीचा खर्च आला.

केंद्र सरकार रेल्वेच्या खाजगीकरणाला परवानगी देणार नाही, असे वारंवार सांगत आहे. परंतु प्रयोगात्मक पाऊल उचलत असल्याचे सांगत खाजगी रेल्वे सेवेला परवानगीही देत आहे. विशेष म्हणजे रेल्वे क्वचित फायद्यात असते अनेकदा तोट्यात असल्याचे सांगितले जाते. परंतु पहिल्याच खाजगी रेल्वेने रग्गड कमाई केल्याचे पुढे आले आहे.

रेल्वेचा रोज सरासरी
१४ लाखांचा खर्च
रेल्वेची सहायक कंपनी ही अत्याधुनिक ट्रेन चालवण्यासाठी रोज सरासरी सुमारे १४ लाख रुपये खर्च करते. तसेच प्रवाशी भाड्यातून दिवसाला सुमारे १७.५० लाख रुपये कमावते. लखनौ-दिल्ली मार्गावर तेजस एक्स्प्रेसचा पहिला अनुभव आहे. त्यामुळे गैर रेल्वे ऑपरेटर आणि आपली सहायक कंपनी आयआरसीटीसीद्वारे ट्रेन चालवली जात आहे, असे सांगण्यात आले.

२५ लाखांपर्यंत मोफत विमा
आयआरसीटीसीने आपल्या प्रवाशांसाठी अनेक प्रकारचे लाभ तयार केले आहेत. संयुक्त भोजन, २५ लाख रुपयांपर्यंत मोफत विमा आणि उशिर झाल्यास भरपाई आदींचा यात समावेश आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR