27.9 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानात ओसंडला महाकुंभ पर्वाचा उत्साह

पाकिस्तानात ओसंडला महाकुंभ पर्वाचा उत्साह

रहिमयार खान : वृत्तसंस्था
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची चर्चा जगभरात सुरू आहे. कुंभमेळ्यात जगभरातील कोट्यवधी भाविक गंगास्रान करत आहेत. मात्र, पाकिस्तानातील हिंदूंना व्हिसा संबंधीत समस्येमुळे या कुंभमेळ्यात सहभागी होता येत नाही. यामुळे पाकिस्तानातील हिंदू बांधवांनी आपला एक वेगळा कुंभमेळा आयोजित  केला आहे. यात गंगेच्या पाण्याने स्नान करून ते आपला भाव प्रकट करत आहेत.
पाकिस्तानी युट्यूबर हरचंद राम याने आपल्या ब्लॉगमध्ये या अनोख्या आयोजनाची झलक दाखवली आहे. रहीमयार खान जिल्ह्यात झालेल्या या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या एका पुजा-याने, आम्ही भारतातील प्रयागराज येथे जाऊ शकत नाहीत. यामुळे आम्ही येथेच महाकुंभचे सेलिब्रेशन केले. जो १४४ वर्षांनंतर आला आहे आणि कदाचित आमच्या आयुष्यातील अखेरचा कुंभमेळा असेल. महाकुंभमेळ्यात गंगास्रानाचे विशेष महत्व आहे. मात्र, पाकिस्तातील हिंदूंना भारतात जाऊन गंगा स्रान करणे अवघड आहे. यामुळे भारतातून गंगेचे पाणी आणून ते येथील पाण्यात टाकण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR