रेणापूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात नागपूर पानगाव वगळता पानगांव येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी आहेत. दरवर्षी प्रमाणे ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी अस्थीला अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात. दि ६ डिसेंबर रोजी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींना अभिवादन करण्यासाठी लाखों अनुयायीनी गर्दी केली होती. येथे जणू निळाईचा भिमसागर उसळल्याचे दिसत होते.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षाही लाखोंचा जनसागर उसळला होता.आंबेडकरी अनुयांयी जथ्थेच्या जथ्थेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो] जयभिम-जयभिम ,अशा घोषणा देत अस्थी अभिवादनाकरिता येत असल्याने अस्थी परिसर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक परीसर अनुयांयीच्या गर्दीने फुलून गेला होता.अभिवादन कार्यक्रमाची सुरवात सोमवारच्या मध्यरात्री म्हणजे ६ डिसेबरच्या पहिल्या मिनीटाला पुष्पचक्र अर्पन करून करण्यात आली नंतर सामुहिक पंचशील त्रिशरण घेण्यात आले. सकाळी ८.३० वाजता रेणापूरच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींना प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक स्थळाचे ध्वजरोहन तहसिलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील ध्वजरोहन रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, माजी जिल्हाधिकारी भाई नगराळेसह सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरानी आंबेडकर यांच्या अस्थीला अभिवादन केले. दुपारी २ वाजता चैत्य स्मारकस्थळी अस्थी अभिवादन सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव होते तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, आनंत लांडगे, चैत्य स्मारक ट्रस्ट चे अध्यक्ष व्ही. के.आचार्य,माजी जि. प. सदस्य सुरेश लहाने,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती उमाकांत खलंग्रे, ट्रस्टचे सचिव वैभव आचार्य, मोहन माने, पुज्य भंते नागसेन बोधी, प्रा.विजय श्रंगारे,बी. पी सुर्यवंशी. उपसरपंच शिवाजी आचार्य,अशोक कांबळे,आदीची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व्ही. के आचार्य, सचिव वैभव आचार्य, राहुल कासारे,आनंद आचार्य, महादू आचार्य,गुलाब चव्हाण आर. के. आचार्य, जयदीप आचार्य, सचिन कांबळे, भैया आचार्य, बी. एस. आचार्य, ऋषीकेश आचार्य, तर डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकचे उपाध्यक्ष नामदेव आचार्य, सूर्यभान आचार्य, दशरथ आचार्य, विष्णू आचार्य, गोरोबा आचार्य, किशोर आचार्य, जे.सी. पानगांवकर, सुभाष आचार्य, तुकाराम कांबळे, गौतम गोडबोले, नागनाथ चव्हाण, रत्नराज आचार्य स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ अधिकारी,१४० होमगार्ड,६० पोलीस कर्मचारी, दोन आरसीपी प्लाटून आणि दोन एसआरपी सेक्शन असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संध्याकाळी भीम गीताचा झाला.